वैद्यराज व्हिजन

घरोघरी आयुर्वेदाचा प्रसारप्रचार व्हावा आणि प्रत्येकाने आपल्या जीवनात आयुर्वेदीय जीवनशैलीचे आचरण करावे यादृष्टीने मे 2000 पासूनवैद्यराज व्हिजनही संस्था कार्यरत आहे. शहरी व ग्रामीण भागात घरोघरी आयुर्वेद पोहोचावा असा वैद्यराज व्हिजनचा संकल्प आहे. आजच्या जीवनशैलीत तज्ञ चिकित्सकाच्या उपचाराची जेवढी आवश्यकता आहे तेवढीच आवश्यकता आयुर्वेद प्रसारप्रचाराची आहे. आयुर्वेदीय दीनचर्या, आहारविहार, योग याची समाजातील प्रत्येक व्यक्तीला गरज आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार करुन लोकांच्या मनात जनीमनी आयुर्वेद ही संकल्पना रूजविण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे.
पूर्वीप्रमाणे घरोघरी आयुर्वेदाचे स्थान सुरक्षित नाही. पूर्वी आजीआजोबा व अनुभवी वैद्य किरकोळ तक्रारींसाठी आयुर्वेदाचा वापर करीत असत. परंतु अलिकडे उठसूठ आपल्याला दवाखान्याचा रस्ता पकडावा लागतो. तेथील उपचार सुरक्षित असतातच असे नाही. एक आजार बरा करतांना दुसरा आजार उद्भवतो. अशा वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमातून आयुर्वेद घरोघरी पोहोचवून जनतेच्या सुखी व निरामय आयुष्यासाठी वैद्यराज व्हिजन ही संस्था सदैव कार्यरत आहे.
 
संस्थेचे उद्देश :-
 1. आयुर्वेद पद्धतीचा शास्त्रोक्त पद्धतीने वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन प्रचारप्रसार व प्रसिद्धी करणे.
 2. योग, आयुर्वेद, निसर्गोपचार, बाह्यरुग्ण विभाग, आरोग्य केंद्र व रुग्णालय उभारणे.
 3. आयुर्वेद, योग, निसर्गोपचार केंद्र स्थापन करणे.
 4. शहरी व ग्रामीण आयुर्वेद रोग निदान व औषधीवाटप व आयुर्वेद व्याख्यानमालांचे आयोजन करणे.
 5. आयुर्वेद प्रसारप्रचारासाठी आयुर्वेदीय साहित्याचे प्रकाशन करणे.
 
 
संस्थेचे कार्यकारी मंडळ :-
 1. वैद्य सुभाष मार्लेवारअध्यक्ष        
 2. वैद्य नंदकुमार मुळ्येकार्याध्यक्ष      
 3. वैद्य अद्वैत फणसाळकरकोषाध्यक्ष       
 4. श्री. शहाजी जाधव सहकार्यवाह
 5. श्री. दिलीप करंबळेकर विश्वस्त
 6. वैद्य राजीव कानिटकरविश्वस्त
 7. वैद्य आनंद गोंधळेकरविश्वस्त
 8. वैद्य प्रफुल्लसप्रेविश्वस्त
याशिवाय महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून होत असलेल्या आयुर्वेद प्रसारप्रचार कार्याच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नामवंत व्यक्तींचा सहभाग आहे.
 
वैद्य सुभाष मार्लेवारअध्यक्ष
हे रा.. पोदार वैद्यक महाविद्यालय येथे स्त्रीरोगप्रसुती तंत्र विषयामध्ये अध्यापन करतात. .. पोदार रुग्णालय, वरळी मुंबई येथे स्त्रीरोग विशेषज्ञ आहेत. मनोवांच्छित संतती व आयुर्वेद, सुरक्षित मातृत्व व आयुर्वेद, जिच्या हाती पाळण्याची दोरी, मला आई व्हायचंय, मला बाबा व्हायचंय या पुस्तकांचे लेखक आहेत. तसेच विविध मासिकनियतकालिकांमधून ते आरोग्यविषयक नियमित लेखन करतात.
 
वैद्य नंदकुमार मुळ्येकार्याध्यक्ष
मुंबई विलेपार्ले भागामध्ये गेल्या 13 वर्षांपासून आयुर्वेद वैद्यकीय व्यवसाय करतात. आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई या संस्थेचे कार्यवाह असून वैद्यराज त्रैमासिकाचे संपादन करतात. आयुर्वेद शास्त्राच्या प्रसारप्रचार कार्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी ही संस्था उभारली आहे. वैद्यराजने आजमितीला निरपेक्ष कार्य करणार्या पाचशे कार्यकर्ते व वैद्यांची फळी उभारली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना दिल्ली येथून जनसेवा सद्भावना पुरस्कार प्राप्त झाला आहे. याशिवाय फ्रीलान्स जर्नलिस्ट वेल्फेअर असोसिएशन ऑफ इंडियातर्फे त्यांना आदर्श समाजसेवक (वैद्यकीय) या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. त्यांच्या कार्याने संस्थेने जी भरारी घेतली ती आजतागायत चढत्या क्रमाने चालूच आहे.
 
वैद्य अद्वैत फणसाळकरकोषाध्यक्ष
तरुण आयुर्वेद चिकित्सक असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माणगांव याठिकाणी वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांचे वडील आयुर्वेदातील ज्येष्ठ तज्ञ असून त्यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा ठेवा त्यांना लाभला आहे. माणगाव येथे त्यांचे दहा खाटांचे रुग्णालय असून या भागामध्ये त्यांनी अनेक रोगनिदान चिकित्सा शिबिरांचे आयेाजन केले आहे.
 
श्री. शहाजी जाधवसहकार्यवाह
संस्थेचे सहसचिव कार्यवाह असून ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचे वास्तव्य आहे. संस्थेच्या नियोजनाची धुरा ते गेल्या अनेक वर्षांपासून सांभाळत आहेत. कार्यालयीन व प्रशासकीय व्यवस्थापन, नियोजन, विविध प्रकल्पांची संकल्पना यात त्यांचा एक तपाहून जास्त अनुभव आहे.
 
श्री. दिलीप करंबळेकरविश्वस्त
हे चेंबूर येथील रहिवासी असू राज्यातील साहित्य चळवळीशी त्यांचा प्रदीर्घ संबंध आहे. कृत्निश्चयी व नियोजनयुक्त स्वभावामुळे साप्ताहिक विवेक परिवारामध्ये ते प्रसिद्ध आहेत. तरुण भारत या प्रसिद्ध दैनिकामध्ये संपादक म्हणून त्यांनी कार्य केले आहे. वैद्यराज व्हिजनचे ते विश्वस्त आहेत. तसेच सध्या विश्वकोश महामंडळाचे अध्यक्ष म्हणून ते काम पाहतात.
 
वैद्य राजीव कानिटकरविश्वस्त
मुंबईच्या प्रसिद्ध गिरगाव व विलेपार्ले भागामध्ये जनतेच्या आरोग्यविषयक गरजांची दखल घेऊन आपला स्वतंत्र आयुर्वेद चिकित्सा व्यवसाय गेल्या दहा वर्षांपासून करीत आहेत. आपले पिताश्री श्री. आण्णाशास्त्री पटवर्धन पुरसकार प्राप्त वैद्य कृ.के. कानिटकर यांच्या रुपाने त्यांना आयुर्वेदाचा महान व प्रदीर्घ वारसा लाभला आहे. त्यांच्या आयुर्वेद परंपरेतील पुढील पिढीचे प्रतिथयश वैद्य म्हणून त्यांचा लौकिक आहे.
 
वैद्य आनंद गोंधळेकरविश्वस्त
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाभोळ येथे आयुर्वेद व्यवसाय करतात. या भागात संस्थेचे प्रचारप्रसाराचे कार्य करतात. संस्थेच्या उभारणीपासून त्यांनी स्वत:ला तनमनधनाने झोकून दिलेले आहे.
 
वैद्य प्रफुल्ल सप्रेविश्वस्त
डिप्लोमा इन नॅचरोपथी (एन.डी.) पदवीधारक असून सहा वर्षं झाराप, जि. सिंधुदुर्ग व आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा या ठिकाणी योग, निसर्गोपचार व आयुर्वेद चिकित्सक म्हणून आपला व्यवसाय करीत आहेत. याग व निसर्गोपचाराचा व्याधी आणि विकारमुक्ती म्हणून चांगला उपयोग होत आहे. अनेक असाध्य विकार योग व निसर्गोपचारामुळे बरे होत आहेत. योग व निसर्गोपचाराचे निवासी रूग्णालय ते लवकरच स्थापन करणार आहेत. त्यांनी आपल्या स्वत:च्या जमिनीमध्ये आयुर्वेदीय वनस्पतींची लागवड देखील केली आहे. संस्थेच्या प्रत्येक कार्यात त्यांचा उत्स्फ़ुर्त सहभाग असतो.
 
वैद्यराज व्हिजनअनेकविध आयुर्वेदीय उपक्रम
 
1 ऑगस्ट 04    वैद्यराज व्हिजनअमरहिंद मंडळदादर               अमर हिंद मंडळ, गोखले रोड, यांच्या संयुक्त विद्यमाने रुग्णनिदान चिकित्सा शिबीर      दादर
1 जानेवारी 05   वैद्यराज व्हिजनमेडिनोव्हा डायग्नोस्टिक सर्व्हिसेस, पुणे   योगदान सुपरस्पेशालिटी सेंटर
          यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत मुळव्याध, भंगदर व       ऑफ पाईल्स, फिश्चुला अॅण्ड
          संधिवात निदान व उपचार शिबीर                  पंचकर्म, पुष्कराज पॅलेस, अहमदनगर
3 एप्रिल 05     वैद्यराज व्हिजनसंत गाडगेबाबा आयुर्वेद प्रतिष्ठान, नांदेड  संजीवन आयुर्वेद रुग्णालय
          यांच्या संयुक्त विद्यमाने मुळव्याधभगंदर रोगनिदान       तरोजेकर चौक, राज हॉटेल समोर,
          चिकित्सा शिबीर                          नांदेड
1 मे 05        कै. डॉ. प्रभाकर चिं. भिडे यांचे स्मृतीप्रित्यर्थ वैद्यराज व्हिजन भिडे आयुर्वेदीक दवाखाना, राजहंस
          आयोजित मोफत आयुर्वेद निदान चिकित्सा शिबीर         बंगला, गणपती मंदिराशेजारी, विश्राम
                                           बाग, सांगली
9 मे 05        वैद्यराज व्हिजन आयोजित आयुर्वेदीय दंतरोग चिकित्सा शिबीर    मु.पो. भू, राजापूर, रत्नागिरी
10 मे 05  वैद्यराज व्हिजन आयोजित आयुर्वेदीय दंतरोग चिकित्सा शिबीर    मु. पो. माणगाव, कुडाळ, सिंधुदुर्ग
11 डिसें. 05     वैद्यराज व्हिजनआयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई व मुरुडजंजिरा     वसंतराव नाईक महाविद्यालय
          नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमानेआयुर्वेदीय रुग्णनिदान मुरुडजंजिरा, जि. रायगड
          चिकित्सा शिबीर
11 डिसें. 05     वैद्यराज व्हिजन व आयुर्वेद विज्ञान मंडळ मुंबई आयोजित   वसंतराव नाईक महाविद्यालय मुरुड
          ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य व्याख्यान                जंजिरा
31 डिसें. 05     ज्येष्ठ नागरिक संघाचा महासंघ, महाराष्ट्र ( फेसकॉम)च्या         भगिनी निवेदिता हायस्कूल, डोंबिवली
          राज्यस्तरीय संमेलनाच्या निमित्ताने वैद्यराज व्हिजन आयोजित
          आयुर्वेद रुग्ननिदान चिकित्सा शिबीर              
1 जाने. 06     ज्येष्ठ नागरिक संघाचा महासंघ, महाराष्ट्र (फेसकॉम)च्या         भगिनी निवेदिता हायस्कूल, डोंबिवली
          राज्यस्तरीय संमेलनाच्या निमित्ताने वैद्यराज व्हिजन व आयुर्वेद
          विज्ञान मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठांचे आरोग्य
          परिसंवाद
4 फेब्रु. 06    वैद्यराज व्हिजनश्री साई सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त शिवाजी नगर (बीएमसी कॉलनी)
          विद्यमाने मोफत आयुर्वेद निसर्गोपचार शिबीर             इमारत 6-7 जवळ, वांद्रे (पूर्व),
                                           मुंबई – 400 051
15 मे 06  वैद्यराज व्हिजनसावंतवाडी नगर परिषद सावंतवाडी व     सावंतवाडी नगरपरिषद दवाखाना
          आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेद
          रुग्ण निदान चिकित्सा शिबीर               
21 जाने. 07    वैद्यराज व्हिजन व आयुर्वेद विज्ञान मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त    लोकमान्य टिळक विद्यामंदिर,
          विद्यमाने आयुर्वेदीय रुग्णनिदान चिकित्सा शिबीर     दाभोळ, ता. दापोली, जि. रत्नागिरी
 
 
 
वैद्यराज व्हिजन ऋणानुबंध :-
वैद्य इंदुभूषण बडे, वैद्य कृ. के. कानिटकर, वैद्य मोरेश्‍वर वैद्य, वैद्य जी. एस. लव्हेकर, श्री. आबासाहेब पटवारी, वैद्य भि. के. पाध्येगुर्जर, वैद्य प्रकाश ताथेड, वैद्य द. ना. दिक्षित, वैद्य रामन घुंगराळेकर, वैद्य संजय पुंड, वैद्य विष्णु बावणे, प. से. सीताराम, कृष्णाजी कुडव, डॉ. सुरेखा देवईकर, डॉ. उषा देशमुख, डॉ. स्नेहा मार्लेवार, तसेच श्री. नामदेवराव सावंत, श्री. आडेलकर, श्री. तानाजी हुस्सेकर, सविता अमर, रुपेश भोईर, महंत राहेरकर बाबा, ध्यानशाश्‍वतजी जामोदेकर बाबा मान्यवर.