बदलत्या जीवनशैलीतील प्राणायामचे महत्व

 

कालसापेक्ष सहज प्राणायामही आजच्या युगामध्ये सहज, सुलभ पण अत्यंत उपयुक्त अशीप्राणायाम साधनाआहे. पुरातन काळामध्ये वाहनांची उपलब्धता सद्यस्थितीतील वाहनाची उपलब्धता यात फरक आहे. पूर्वीच्याकाळी पायी प्रवास करण्याची पध्दत होती. आता दळणवळणाच्या साधनांचा वापर खूप वाढला आहे. ताणतणाव वाढला आहे. त्यामुळे प्राणायामाची आवश्यकताही नितांत वाढली आहे.

 

प्राणायाम हा योगसाधनेतील महत्त्वाचा टप्पा आहे. योग साधना ही जीवनपध्दती आहे.  श्रीमद् भागवतगीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने चार प्रकारचे योग सांगितले आहेत.
1) राजयोग 2) भक्तियोग 3) कर्मयोग 4) ज्ञानयोग. दर्शन शास्त्रांमध्ये योग दर्शन शास्त्र महर्षी पतंजलीने सांगितले आहे. अष्टांग योगाचे वर्णन करताना श्रम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान व समाधी या आठ अंगाचे वर्णन आलेले आहे.

1) यम : समाजात वावरताना पाळावयाचे व्रत म्हणजे यम होय. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे पाच यम सांगितले आहेत.

2) नियम : वैयक्तिक जीवनात पाळावयाचे व्रत म्हणजे नियम होत. शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे पाच नियम सांगितले आहेत.

3) आसन : अंतिम अवस्थेत जो स्थिर व सुखमय आहे असा साधनेसाठी आवश्यक असलेला शरीराचा आकृतिबंध म्हणजेच आसन होय.

4) प्राणायम : मनोनियंत्रणासाठी प्राण संकल्पनेसह केलेले श्वसन नियंत्रण म्हणजे प्राणायाम होय.

5) प्रत्याहार : इंद्रिय विषय निवृत्ती, इंद्रियांची विषय विन्मुखता म्हणजेच प्रत्याहार होय.

6) धारणा : मनात एकाच विषयावर केलेले चिंतन किंवा केंद्रीकरण म्हणजे धारणा होय.

7) ध्यान : धारणेतील ध्येय विषयाचे अविरत चिंतन व त्या विषयांशी एकरूप होणे म्हणजेच ध्यान होय.

8) समाधी : ध्याता आणि ध्येय यांच्या एकरूपतेनंतर आलेली स्वरूप शून्यता म्हणजेच समाधी होय.

3             1             2

प्राणायाम हे योग साधनेतील महत्त्वाचे अंग आहे. महर्षि पतंजलीने या महत्वाच्या टप्प्याचे वर्णन याच सूत्रांमध्ये केलेले आहे.

तस्मिन्सति श्वासप्रश्वासयोर्गतिविच्छेद : प्राणायाम : आसनासिद्दी झाल्यावर निसर्गत: गतिचा विच्छेद करणे म्हणजे ती खंडित करणे म्हणजे प्राणायाम होय.

स्वस्थ पुरुषाची श्वसनगती चोवीस तासात 1,600 वेळा म्हणजे प्रतितास 900 वेळा म्हणजेच प्रति मिनीट 15 वेळा अशी आहे. या श्वासगतीवर नियंत्रण करणे म्हणजेच प्राणायाम होय.

हठयोग प्रदीपिकेमध्ये आठ प्राणायामाचा उल्लेख आलेला आहे. या ग्रंथामध्ये प्राणायामासाठी कुंभक या संज्ञेचा वापर केलेला आहे.

सूर्य भेदनमुज्जायी सीत्कारी शीतली तथा ।

भस्त्रिका भ्रामरी मर्ूच्छा प्लाविनीत्यष्ट कुम्भका : ॥ ह.प्र. 2-44

सूर्यभेदन, उज्जायी, सीत्कारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मर्ूच्छा व प्लाविनी हे आठ प्रकारचे कुंभक (प्राणायाम) आहेत. अष्ट प्राणायाम करण्यापूर्वी नाडिशुध्दी केली पाहिजे. नाडी म्हणजे धर्मचक्षूंना न दिसणारा पण योगदृष्टीला जाणवणारा प्राणशक्तिचा सूक्ष्म असा संचार मार्ग आहे. नाडीशुध्दी क्रियेचे वर्णन सर्वप्रथम हठप्रदीपिका व घेरंडसंहिता या दोन्ही हठयोगावरील ग्रंथात केलेले आहे.

बध्द पद्मासनो योगी प्राणं चन्देण पूरयेत ।

धारयित्वा यताशाक्ति भूय : सूर्येण रेचयेत ॥

प्राणं सूर्येण वाकृष्ण पूरयेदुदरं शनै : ।

विधिवत कुम्मऊं कृत्वा पुनश्चन्द्रेण रेचयेत ॥ ह.प्र.

पद्मासनात बसून योग्याने डाव्या नाकपुडीने (चंद्रनाडी) प्राण आतमध्ये घेत घेत पूरक करावा. दोन्ही नाकपुडया बंद करून जमेल व झेपेल (यथाशक्ती) असा कुंभक करावा. नंतर उजव्या नाकपुडीने (सूर्य नाडिने) रेचक करावा. त्यानंतर उजव्या नाकपुडीने पूरक करावा. पुन: यशाशक्ती कुंभक करावा. नंतर डाव्या नाकपुडीने रेचक करावा. नाडीशुध्दीनंतर प्राणायामासे सुरूवात करावी. प्राणायाम करताना त्रिबंध युक्त प्राणायाम करावयास शास्त्रकाराने सांगितले आहे.

1) मूलबंध 2) जालंधbanhaर बंध 3) उड्डीयान बंध हे त्रिबंध आहेत.

अष्टप्राणायामामध्ये सूर्यभेदत प्राणायाम करताना सुखासनात किंवा पद्मासनात बसून उजव्या नाकपुडीने पुरक करावा. नंतर यथाशक्ति. कुंभक करावा. नंतर डाव्या नाकपुडीने रेचक करावा. हे सूर्यभेदन प्राणायामाचे एक आवर्तन झाले.

दुसरा प्राणायाम म्हणजे उज्जायी प्राणायाम होय. दोन्ही नाकपुडयांतून घशाला स्पर्श करत करत पूरक अशा प्रकारे करावा की स्पर्शजन्य ध्वनी निर्माण व्हावा. तसेच कंठापासून हृदयापर्यंतच्या क्षेत्रात हवेचा स्पर्श जाणवावा. नंतर यथाशक्ति कुंभक करावा. नंतर डाव्या नाकपुडीत रेचक करावा.

तिसरा प्राणायाम शीतकारी  होय. शीतकारी या शब्दातच कृती कशी असावी हे सांगितले आहे. तोंडाने पूरक करताना जीभ दातांना आतल्या बाजूने अशी लावावी की दातांच्या फटीतून आतमध्ये हवा शिरताना ‘सी ऽ ऽ ऽ’ असा मिटून यथाशक्ति कुंभक करावा नंतर दोन्ही नाकपुडीने रेचक करावा. चौथा प्राणायाम शीतली प्राणायाम आहे.pranayama_03

शीतकारी व शीतली प्राणायामात फरक आहे तो जीभेच्या रचनेच्या व जागेचा आहे. शीतकारीमध्ये जीभ दातांना आतल्या बाजूने थोडीशी पसरट करून लावताते तर शीतली मध्ये जीभ थोडीशी बाहेर काढून तिच्या दोन्ही बाजू वरच्या बाजूल वळवतात असा पन्हाळीचा आकार असलेल्या जीभेच्या मधल्या पोकळ भागातून हवा आतमध्ये घेतात व ओठ मिटून थोडेसे नाकावाटे रेचक करतात.

पाचवा प्राणायाम म्हणजे भस्त्रिका प्राणायाम होय. भस्प्रिका प्राणायाम करताना लोहाराच्या भात्याप्रमाणे आवाज निर्माण होतो. संच पूरक-रेचक करुन भस्त्रिका प्राणायाम करता येतो व तसेच जलद पूरक-रेचक करून पण भस्त्रिका प्राणायाम करतात.

bhramari-copyसहावा प्राणायाम म्हणजे भ्रामरी प्राणायाम होय. भ्रामरी प्राणायामात दीर्घ पण यथाशक्ति पूरक करावा. नंतर रेचक करताना भुंग्यासारखे गुंजन करावे. गुंजन हे नाकातून न येता स्वरयंत्रातील कंपनातून यावा हे अपेक्षित असते.

सातवा प्राणायाम म्हणजे मूर्च्छा प्राणायाम होय. दोन्ही नाकपुडयांनी पोटापर्यंत उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा करून पूरक करावा. नंतर दोन्ही नाकपुडया बंद करून त्रिबंध युक्त अल्प कुंभक करावा. नंतर प्राणायाम मुद्रा सोडून हात उजव्या मांडीवर ठेवा. जालंधर बंध तसाच ठेवून उड्डीयान बंध सावकाशपणे सोडत रेचक करा. रेचक पूर्ण झाल्यावर जालंधर बंध सोडावा.

आठवा प्राणायाम म्हणजे प्लाविली प्राणायाम होय. तोंडाने हवा आतमध्ये घेऊन पुरक करावा. अल्प कुंभक करावा नंतर तोंडानेच रेचक करावा.

वरील आठ प्राणायाम योग ग्रंथांमध्ये आलेले आहेत.

सद्यस्थितीमध्ये सहज योग किंवा सहज प्राणायाम साधना सर्वांना उपयोगाची आहे. ‘सहज योग’ म्हणजे सहजतेने पालन करता येणारा योग. साधना अशी असावी की, सामान्य साधकाला सहजतेने करता यावी. आपल्याला हे जमण्यासारखे आहे. हा भाव नियमित साधना करण्यास प्रवृत्त करणारा आहे. प्राणायाम करताना सुरूवातीच्या काळात कुंभक रेचक यामध्ये प्रमाण सांगितले असले तरीही मात्र मोजण्याच्या जंजाळात न फसता प्राणायामाचे सर्व प्रकार मनोयुक्त होऊन करावेत. मनापासून वृत्ती करावी. कृतीशी मन जोडले जावे, मनाने समस्स व्हावे, एकाग्र व्हावे. एकाग्रतेतून आनंद प्राप्ती व्हावी. प्राणायाम साधनेत संख्यात्मक आवर्तनापेक्षा गुणात्मक परिणामाला व दिव्य प्रत्ययाला महत्त्व आहे यात शंका नाही. प्राणायाम साधनेत काल सापेक्षता आली पाहिजे.

 

वैद्य कैलास रामराव सोनमनकर

B.A.M.S., M.D.

सहाय्यक प्राध्यापक, रा. . पोदार वैद्यक महाविद्यालय, मुंबई

मो. 8291385015

Email – sonmankarkailas1971@gmail.com