प्रकृती ज्ञान

आयुर्वेदात सप्तविध देह प्रकृती सांगितल्या आहेत. वातज, पित्तज, कफज. प्रकृतीनुसार व्यक्तीमध्ये आढळणारे गुण किंवा त्यांची शारीरिक क्षमता कोणत्या व्यवसायाकरिता अनुकूल होवू शकते हे जाणून घ्यायचे असेल तर हा लेख वाचलाच पाहिजे.
————————————————–
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील कर्तृत्व त्याच्या शारीरिक प्रयत्नांवर, मानसिक घटनेवर तसेच त्याच्या आवडी-निवडीवर अवलंबून असते. आयुर्वेद शास्त्रात प्रकृति परिक्षण, सत्त्व परिक्षण, सार परिक्षण यांचे वर्णन करत असताना त्या व्यक्तीच्या गुणांचा उपयोग केला आहे. म्हणून व्यवसायात कार्यरत असणार्‍या व त्यामध्ये यश संपादन केलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव त्यांच्या यशामध्ये आढळून येतो. वात प्रकृतीची व्यक्ती अल्पधन, अल्पसाधन असलेली तर मेद मांससार व्यक्ती वित्तसंपन्न असते.
शरीर व मन हे एकमेकांवर प्रभाव पाडणारे आहेत. तेव्हा प्रकृती म्हणजे दोषांचा शरीरातला स्तर, धातुसारता म्हणजे धातूंची शरीरामध्ये उपस्थिती व सत्त्व परिक्षा म्हणजे मनाचे बलाबल यांचा एकत्रित विचार केला असता व्यक्तीच्या गुणांचे अधिक विस्ताराने अवलोकन होवू शकते.
आयुर्वेदात सप्तविध देह प्रकृती सांगितल्या आहेत. वातज, पित्तज, कफज. पुढे आपण प्रकृतीनुसार व्यक्तीमध्ये आढळणारे गुण किंवा त्यांची शारीरिक क्षमता कोणत्या व्यवसायाकरिता अनुकूल होवू शकते ते पाहूया.
1) वातप्रधान किंवा वातज प्रकृती :-
या प्रकारच्या प्रकृतीच्या व्यक्ती व्यक्तीत बुद्धीमत्तेचे स्वरुप वेगळे असते तसेच काम करण्याची शक्तीही वेगवेगळी असते.
* ज्यांची बुद्धी चांगली अशांना शैक्षणिक पेशात खूप संधी असते. उदा. शिक्षक, प्रोफेसर
* वकील, कंपनी सेक्रेटरीज्, मॅनेजर्स
* कॅटरिंग, आचारी, दुकानदार
* कला क्षेत्र- गायन, वादन, चित्रकला, हस्तकला
* अग्निजवळ करावे लागणारे पण बेताची शक्ती वापरावे लागणारे उद्योग
* इलेक्ट्रॉनिकचे उद्योग, इंटेरिअर डेकोरेशन
* पुस्तक व्यवसाय, टायपिंग
* हॉटेल्स, रिसेप्शनिस्ट
* उत्तम बुद्धीच्या लोकांना तत्त्वज्ञानाचे अभ्यासक्रम, व्यवस्थापन, अनेक भाषांचे आकलन सहज होते.
2) पित्तप्रधान किंवा पित्तज प्रकृती :-
पित्त प्रकृती व्यक्ती शौर्य, साहस, महत्त्वाकांक्षा, ध्येय या गुणांच्या असतात.
* संरक्षण दल, सैनिक, भूदल-नौदल-वायूदल, पोलिसदल, होमगार्डस् ही क्षेत्रे खास त्यांचीच.
* त्यांची बुद्धी चांगली त्यामुळे बैठे पण बौद्धीक व्यवसाय उदा. प्राध्यापक, वैद्य, डॉक्टर, वकील, एअर होस्टेस, लेखन, ग्रंथपाल आदी.
* टायपिंग, इलेक्ट्रॉनिक्सची उपकरणे, मशिन आदी कारखान्यातील कामे.
* कलाकुसरीचे, कौशल्याचे काम – उदा. शिवणकाम (फशन डिझायनिंग)
असे अनेक शारीरिक कष्ट कमी असणारे व्यवसाय पित्त प्रकृतीच्या व्यक्तींना अनुकूल ठरतात. त्यांना उष्ण हवा, उष्ण प्रदेश, उष्ण वातावरण, कष्टाची कामे, अखंड चालणारी श्रमाची कामे सोसाणार नाहीत. त्यामुळे मन, शरीर दोन्ही थकते.
3) कफ प्रकृती आणि कफ प्रधान प्रकृती :-
या व्यक्ती भरपूर श्रम करु शकतात. उपवास सहन करु शकतात. शांतपणे तक्रारी ऐकून घेवू शकतात. स्वभावाने प्रेमळ असतात. शांत असतात. रात्री जागरण करणे त्यांना सहन होते. म्हणून त्यांना पुढील व्यवसाय अनुकूल होवू शकतात.
* संरक्षण दल
* तांत्रिक विद्यालये
* फिरते व्यवसाय
* शारीरिक श्रमाचे व्यवसाय- शेती काम
* अभिनय क्षेत्र
* वैद्यकीय क्षेत्र
* वकिली व्यवसाय
प्रकृती ही जन्मजात असते. आपण तिला बदलू शकत नाही. तर प्रकृतीला अनुकूल अशा गोष्टी आचरणात आणून तिचा फायदा मात्र नक्कीच घेवू शकतो. आपली प्रकृती माहित करुन घेणे आणि त्याप्रमाणे आपला आहार-विहार ठेवणे. आवश्यक ती चिकित्सा उदा. पंचकर्म करुन घेणे हीच व्यवसायात यश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे.